आयुष्यात शांत कुठे रहावे? जेथे नुकसान होणार नाही

नमस्कार मित्रांनो आयुष्यात काही क्षण असे असतात. ज्यावेळी आपल्याला शांत रहाणे गरजेचं आहे. कारण आपली शांतता वर्तमान व भविष्यात येणाऱ्या संकटापासून वाचवू शकते. त्यामुळे अशा वेळी शांत रहाणे, तुमच्या समजदारीचे लक्षण बनते. पण आयुष्यात असे क्षण कोणते? तर चला जाणून घेऊया.

1)जेव्हा जास्त राग येईल अशा वेळी शांत रहा.
मित्रांनो काही लोकांवर आपल्याला त्यांच्या चुकीच्या कृतिमुळे खूप जास्त राग येतो. पण अशा वेळी स्वतःला शांत ठेवायचे आहे. कारण रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा ठरत असतो. ज्यामुळे आपल्याला भविष्यात किंवा त्यावेळी संकटांचा सामना करावा लागतो. रागात माणूस कोणाला कधी काय बोलेल याचा त्याला पण अंदाजा राहत नाही. 
 
राग आणि तुफान दोन्हीमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे राग आणि तुफान गेल्यावर समजते की नुकसान किती झाले आहे. त्यामुळे शांत राहण्याचा किंवा त्या ठिकाणावरून दूर जाण्याचा प्रयत्न करा.

2)जर तुम्हाला संपूर्ण गोष्ट माहित नसेल तर शांत रहा.
मित्रांनो आपण मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत बोलायला जातो. तेव्हा ते कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलत असतात. अशावेळी आपण खात्री करून घेतली पाहिजे. की आपल्याला त्या मुद्द्याबद्दल संपूर्ण माहिती आहे का? 

कारण अर्धसत्य हे नेहमी पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य पेक्षा खतरनाक असते. कोणत्याही गोष्टीची अर्धी माहिती तुम्हाला चुकीचा ठरवू शकते किंवा तुमच्याबद्दल मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण करू शकते. यामुळे गोष्ट महत्वाची असेल तर संपूर्ण माहिती असेल तर बोला नाहीतर शांत रहा.

3)जर तुम्ही ओरडून बोलत असाल तर शांत रहा 
मित्रांनो कोणासोबत पण बोलत असताना सर्वात मोठी गोष्ट ध्यानात ठेवायची असते ती म्हणजे आपण  नीट बोलत आहे का? कारण काही लोकांना मोठया मोठयाने बोलायला आवडते. पण मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत बोलत असताना आपला आवाज मध्यम असावा ज्यामुळे आपल्याला किंवा दुसऱ्याला त्रास होणार नाही.

4)जर शांत राहिल्याने नातं वाचू शकतं तर शांत रहा 
मित्रांनो कधी कधी बोलण्यापेक्षा ऐकून घेणे महत्वाचे असते. नाते संबंधामध्ये पुढच्याचे बोलणे ऐकून घेणे महत्वाचे असते. कारण शब्दाने शब्द वाढू शकतो. म्हणजे भांडण होऊ शकते. ज्यामुळे आपण जर शांततेने पुढच्या व्यक्तीचे बोलणं ऐकून घेतलं तर भांडण होणार नाही. 
 घरात शांतता ठेवण्यासाठी कोणीतरी शांतता राखणे गरजेचं आहे.यामुळे नातं आयुष्यभर टिकू शकतं.

5) जर तुम्ही जास्त भावुक असाल तर शांत रहा.
मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीमुळे जास्त भावुक होता. तेव्हा शांत रहा. कारण भावनांमध्ये खूप ताकद असते त्यांचा फायदा उचलून लोकं तुमच्या विरोधी कट करस्थान करू शकतात. म्हणजे लोकं तुमच्या भावनांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकतात.
त्यामुळे जास्त भावुक झाल्यावर शांत राहण्याचा किंवा एकटं राहण्याचा प्रयत्न करा. 

#silence #Marathi #marathi #lesson #knowledge #shantraha #शांतता 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.