इंग्रजी मध्ये स्वतःची ओळख कशी करून द्यावी? | How to Introduce Yourself in English?

नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी भाषेतून स्वतःची ओळख करून द्यावी लागते. इंग्रजीतून ओळख करण्यासाठी इंग्रजी बोलायला लागणार आणि इंग्रजी बोलायचा विषय आला कि आपल्याला भीती वाटते. ज्यांना इंग्रजी येते त्यांच्यासाठी सोपं आहे. पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हि एक अवघड परीक्षा असते. कंपनी च्या प्रत्येक मुलाखती मध्ये सर्वात पहिला प्रश्न म्हणजे Introduce yourself म्हणजे स्वतःची ओळख सांगा. 

आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो कि फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे देऊन स्वतःच इंप्रेशन चांगल व्हावं हे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे इंग्रजी भाषेतून अगदी सोप्या शब्दात मुलाखती मध्ये स्वतःची ओळख कशी करून द्यायची? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या लेखामध्ये पाहणार आहे.

Self Introduction in English 

•Step-1) Greeting (अभिवादन )
स्वतःची ओळख करून देण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अभिवादन करणे गरजेचं असते. अभिवादन करण्यासाठी काय बोलायचं हे महत्वाचं आहे. 

जर तुमची मुलाखत दुपारच्या बारा वाजायच्या आधी असेल तर    Good Morning (गुडमॉर्निंग ) म्हणायचं बारा नंतर  असेल तर Good Afternoon (गुडआफ्टरनून ) आणि संध्याकाळी असेल तर Good Evening (गुडइव्हनिंग). त्यासोबत Sir किंवा Madam हा शब्द वापरायचा. तसेच तुम्हाला दिलेल्या संधी बद्दल धन्यवाद करायच.

उदाहरण - Good morning sir/madam. First of all thank you for  giving me this opportunity to introduce myself.

•Step-2) Name & Family (नाव आणि कुटुंब )
तुम्हाला अभिवादन केल्यानंतर स्वतःच नाव आणि तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती देणे गरजेचं आहे. स्वतःच नाव अगदी सोप्या प्रकारे तुम्ही सांगू शकता. 
उदाहरण - माझं नाव विनोद आहे. My Name is Vinod.
Vinod नावाच्या जागी तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. एवढं सोपं आहे.

त्यानंतर कुटुंबाबद्दल माहिती सांगताना. 
My Family Consist of या वाक्यानंतर ( जर तुमचे आई वडील दोन्ही आहेत तर My Parents बोला, जर फक्त आई असेल तर My Mother बोला, जर फक्त वडील असेल तर My Father बोला. त्यानंतर आजी आजोबा असेल तर My Grandparents बोला,  जर फक्त आजी असेल तर My Grandmother बोला, जर फक्त आजोबा असेल तर My Grandfather बोला. त्यानंतर मोठा भाऊ असेल तर My Elder Brother, छोटा असेल तर My Younger Brother. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बहीण असेल तर brother च्या जागी sister हा शब्द वापरा.

उदाहरण - My Name is.. (तुमचं नाव) Family Consist of my Parents/Father/Mother, My Grandparents/Grandfather/Grandmother & My Elder/Younger Brother/Sister. 


Step-3) Address ( पत्ता )
तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता सांगायचा आहे. घराचा पत्ता अगदी सोप्या प्रकारे कसा सांगायचा तर चला जाणून घेऊया.

Basically, I am from.(गावाचं नाव )... village in... (जिल्ह्याचे नाव )..district... (राज्याचे नाव ) but currently residing in.... (शहराचं आणि राज्याचे नाव )

Step-4) Education (शिक्षण )
तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पदवी बद्दल सांगायचं आहे. तुमचं शिक्षण किती झाले आहे. 

I have completed ... (पदवी/डिग्री चे नाव ) from.. (युनिव्हर्सिटी चे नाव )

•Step-5) Strength (शक्ती )
तुमच्या मधील कोणते असे गुण आहेत जे तुमची शक्ती बनू शकतात. जसं तुम्ही कष्टाळू , शिकण्यासाठी तत्पर त्याबद्दल इंग्रजी मधून सांगायचं 

My Strength are Hard Working and Good learner.

Step- 6) Goal (ध्येय )
तुमचा भविष्यातील ध्येय काय आहे? याबद्दल सांगायचं असेल तर  मला एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरी पाहिजे आणि भविष्यात चांगल्या पदावर राहायचं आहे.

My short term goal is to get a job in reputed company and my long term goal is to get a good position.

•Step - 7) Experience (अनुभव )
तुम्हाला कामाचा किती अनुभव आहे. याबद्दल सांगायचं आहे. जर तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल तर स्टेप बाय स्टेप सांगायचा.

I have.(किती वर्षाचा अनुभव ). Years of  working experience. I am currently working in.. (कंपनी चे नाव, डिपार्टमेंट, पॉजिशन सांगा )

•Step-8) End (शेवट )
या सर्व गोष्टी सांगितल्या नंतर शेवट कसा करायचा हे महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे कि 

Thanks again for the opportunity to have this all about me.

Complete Introduction (संपूर्ण ओळख )

Good Morning Sir/Madam. First of all thank you giving me this opportunity to introduce myself. My Name is.. (Your Name). My family consist of.. (Parents/grandparents/Brother/sister). Basically, I am from.. (district & State Name) but currently residing in.. (City name). I have completed.. (Degree Name ) from.. (University name). My Strength are hardworking and good learner. My short term goal is to get a job in reputed company and my long term goal is to get a good position. I have.. (number) years of working  experience. I am currently working in.. (Your company name) 

Thanks again for the opportunity to have this all about me.

#EnglishSelfIntroduction #englishintroduction #selfintroduction #introduction #interviewselfintroduction 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.